Global Maharashtra Breaking News

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली आणि ओरोस येथे तिथीप्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी…

⚡मालवण ता.१७-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली आणि ओरोस येथे तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते ओरोस जिल्हा मुख्यालय येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ शिवपुतळ्याला व शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करण्यात आला.तसेच कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब…

Read More

सावंतवाडीत रंगपंचमी उत्साहात…

⚡सावंतवाडी ता.१७-: शिमगोत्सव विविधांगी पद्धतीने साजरा करण्याची प्रथा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. सावंतवाडी शहरात आज पाच दिवसांचा रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वत्र रंगांची उधळण केल्यान शहर रंगात न्हाऊन गेलं होतं. रंगपंचमी निमित्ताने तरुणाई रस्त्यावर उतरली होती. डीजे, ढोल ताशाच्या तालावर अबालवृद्ध थिरकताना पहायला मिळाले. महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.ठिकठिकाणी युवक-युवतींनी रंगपंचमी साजरी करत रंगपंचमीचा…

Read More

नागरिकांनी आपल्या कर्तव्यांकडे लक्ष देणे गरजेचे…

जिल्हाधिकारी अनिल पाटील.. कणकवली : शासन म्हणून काम करत असताना ग्राहकांसाठी खूप कायदे अमलात आले आहेत. सर्व नागरिकांना आपले हक्क आणि अधिकार माहिती आहे. मात्र कर्तव्य माहिती आहे की नाही हे पडताळ पाहिजे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या कर्तव्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जनतेसाठी असलेल्या योजनांचा सर्वांनी लाभ घेतला पाहिजे. आपण सेवा घेताना ती पार पाडतो की…

Read More

ठाकरे गटाच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती सावंतवाडी शिवसेना शाखेत साजरी…!

⚡सावंतवाडी ता.१७-: उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज तिथीनुसार शिवजयंती निमित्ताने सावंतवाडी शिवसेना शाखेत शिवजयंती साजरी करण्यात आली.दरम्यान मूर्तीला पुष्पहार अर्पण करून जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा सर्वांच्या वतीने देण्यात आल्या. यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार,युवा कार्यकर्ते आशिष सुभेदार, शहरप्रमुख शैलेश गौंडळकर,उदय अळवणे,उपविभाग प्रमुख विनोद ठाकूर ,ग्रामपंचायत सदस्य अशोक धुरी माजगाव हे सर्व उपस्थित होते.

Read More

शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी…!

⚡सावंतवाडी ता.१७-: शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार आज साजरी करण्यात आली यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते खासकीलवाडा येथील शिव पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला यावेळी जय शिवाजी जय भवानी अशा घोषणा देण्यात आले.यावेळी शिंदे शिवसेनेचे शहर प्रमुख बाबू कुडतरकर गजानन पालव परीक्षित मंत्री कर प्रशांत साटेलकर, सचिन साटेलकर, गजानन नाटेकर दिपाली सावंत…

Read More

शिवचरित्र परीक्षेत मदर क्विन्स इंग्लिश स्कूलचे जिल्हास्तरावर घवघवीत यश…

⚡सावंतवाडी ता.१७-: सिं. जि . शि. प्र. मंडळ संचलित मदर क्वीन इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या विद्यार्थिनी मातृभूमी शिक्षण संस्था सावंतवाडीतर्फे आयोजित छत्रपती शिवचरित्र स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळवले. शिवसंस्कृतीचे जतन व शिवचरांचे मंथन हा विचार व आचार रुजविण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या या जिल्हास्तरीय लेखी परीक्षेत प्रशालेची इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी कु. समीक्षा केसरकर हिने १०० पैकी 95 गुण…

Read More

किल्ले शिवनेरी गडावर तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव साजरा…

मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती.. ⚡शिवनेरी दि.१७-: किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. या शिवजन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होऊन त्यांनी छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा दिला आणि अभिवादन केले.यावेळी स्थानिक आमदार शरद दादा सोनावणे व स्थानिक नेत्या…

Read More

आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पाण्याच्या जारचे वाटप…

⚡सावंतवाडी ता.१७-: कुडाळ मालवण मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी शहरातील रुग्णालये, शासकीय आस्थापनांमध्ये मोफत पाण्याच्या जारचे वाटप करण्यात आले.शिवसेनेचे युवा नेते आ. निलेश राणे यांचा वाढदिवस सावंतवाडी शहरासह तालुक्यात विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा केला जात आहे. शिवसेना, संजू परब मित्र मंडळ व सह्याद्री फाउंडेशनच्या माध्यमातून यानिमित्त विविध उपक्रम साजरे करण्यात येत…

Read More

पाट अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल…

अल्पवयीन बाईक चालक आणि त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल.. कुडाळ : पाट तिठा येथे डंपर व मोटारसायकल यांच्यात आज सकाळी 6.40 वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात पाट हायस्कूलची विद्यार्थीनी मनस्वी सुरेश मेतर (वय 16, रा.निवती मेढा, ता.वेंगुर्ले) हि डंपर खाली सापडून जागीच ठार झाली. तर मोटारसायकलस्वार जखमी झाला. मनस्वीचा उद्या सोमवारी दहावीचा शेवटचा पेपर होता. ती क्लास…

Read More

जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेमध्ये खुल्या गटातून अर्जुन रावराणे विद्यालयाचे कलाशिक्षक मंदार चोरगे यांनी पटकावला प्रथम क्रमांक…

⚡वैभववाडी ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग यांच्यावतीने संस्थेचा ४१ व्या वर्धापन दिन व संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय निबंध , वक्तृत्व व हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेमध्ये खुल्या गटातून वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी चे कलाशिक्षक मंदार सदाशिव चोरगे यांनी प्रथम…

Read More
You cannot copy content of this page