Headlines

Global Maharashtra Breaking News

शिंदे शिवसेनेच्या ममता वराडकर यांनी घेतला राणेंचा आशीर्वाद…!

⚡मालवण ता.२६-: मालवण नगरपरिषद निवडणूक 2025 साठी शिवसेना नगराध्यक्षा उमेदवार सौ. ममता वराडकर यांनी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, सौं. निलमताई राणे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक उमेदवार दिपक पाटकर, शहर संघटक राजू बिडये, निकीत वराडकर यांसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Read Full News

मालवण नगरपालिका प्रभाग ८ मधील शिवसेना प्रचार कार्यालयाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते उदघाटन…

मालवण, दि प्रतिनिधी:मालवण नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. वर्षभरात जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केलेले नियोजन व मी आमदार या नात्याने केलेले काम या जीवावर आम्ही नगरपालिका निवडणुकीसाठी मते मागत असून येथील नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदासह सर्व वीसही उमेदवार निवडून येतील. विकास हा केंद्र बिंदू ठेऊन आम्ही ही निवडणूक लढवत…

Read Full News

देश आणि संविधानाप्रती सजग राहा…

डॉ. मोहन दहीकर:बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत २६/११ हल्ल्यातील शहिदांना मानवंदना.. कुडाळ : मुंबईतल्या बॉम्बस्फोटसारख्या घटना असतील किंवा २६/११ सारखे देशावरचे हल्ले असतील, अशावेळी आपण नागरिक म्हणून सुद्धा सजग राहिलं पाहिजे. सैन्यदल, पोलीस सर्वंठिकणी पोहोचतीलच असं नाही, आपणच आपल्या संविधानाचे रक्षण करण्यासाठी जागृत असलं पाहिजे असं मत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी व्यक्त…

Read Full News

सावंतवाडीत अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप…

⚡सावंतवाडी ता.२६-: सावंतवाडी नगरपरिषद निवडणूकीसाठी ७ अपक्षांनी नामनिर्देशन पत्र कायम ठेवल असून आज त्यांना चिन्हांच वाटप करण्यात आल आहे‌. नगराध्यक्षपदास २, नगरसेवक पदासाठी ५ असे ७ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात असून शहरात अपक्षांचाही मोठा जोर आहे. यात नगराध्यक्षपदासाठी अन्नपूर्णा कोरगावकर यांना मेणबत्ती व निशाद बुराण यांना बॅट चिन्ह मिळालं आहे. नगरसेवक पदासाठी फरीदा बागवान फुटबॉल,…

Read Full News

क्रांतिकारी विचार पक्षाच्या शहर विकास आघाडीला चिन्ह नारळ…

लोकराज्य जनता पार्टी पक्षाचे उमेदवार गणेशप्रसाद पारकर यांना मिळाले कपबशी चिन्ह.. कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी शहर विकास आघाडी अंतर्गत क्रांतिकारी विचार पक्षाच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार व नगरसेवकपदाच्या उमेदवारांना नारळ चिन्ह मिळाले आहेत. नगरपंचायत निवडणुकीसाठी १८ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. त्यानंतर २१ नोव्हेंबरपर्यंत माघारीची मुदत होती. या मुदतीनंतर राज्य निवडणूक आयोगाने २५ नोव्हेंबरपर्यंत अपील…

Read Full News

शहरात पाणीटंचाई भासत नाही याच श्रेय मठकर यांनाच आहे…

रमेश बोंद्रे: नगराध्यक्षपदासाठी सावंतवाडीकरांनी सीमा मठकर यांना संधी द्यावी.. ⚡सावंतवाडी ता.२६-: माजी आमदार जयानंद मठकर यांनी सावंतवाडीसाठी दिलेलं योगदान मोठं आहे. १९७४ साली पहिल्यांदा आमदार झाले. सामान्यातील आमदार अशी त्यांची ओळख होती. शहरातील पाणी प्रश्न गंभीर होता. यावेळी पाळणेकोंड धरणासाठी त्यांनी प्रयत्न केला. शहरात पाणी टंचाई भासत नाही याच श्रेय श्री. मठकर यांना आहे असं…

Read Full News

प्रभाग ७ मध्ये ठाकरे गटाच्या आर्या सुभेदार व संदीप राणेंचा प्रचार जोरात…

⚡सावंतवाडी ता.२६-: प्रभाग क्रमांक ७ मध्ये उद्वधव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार प्रचारात आघाडी सौ आर्या सुभेदार व श्री संदीप राणे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्याना घरोघरी मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे. संदीप राणे व आर्या सुभेदार नवे चेहरे आहेत. त्यांनी त्याच प्रभागातील दिग्गजांना आव्हान दिले असून त्यांचा मतदारांवर प्रभाव पडत आहे. त्यांनी डोअर…

Read Full News

समाजकार्याची पोचपावती म्हणून मला जनता मतांच्या रूपाने आशीर्वाद देतील…

देव्या सूर्याजी: प्रभाग क्रमांक सहा मध्ये घेतली जोरदार आघाडी.. ⚡सावंतवाडी ता.२६-: शिंदे शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 6 चे उमेदवार देव्या सूर्याजी व शर्वरी धारगळकर यांनी प्रभागात गाठीभेटी, जनसंपर्क व प्रचारयात्रा राबवित जोरदार प्रचारात आघाडी घेतली असून नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अँड. नीता सावंत कविटकर यांच्यासह शिंदे शिवसेनेचे सर्वच उमेदवार विजयी होतील, असा…

Read Full News

सुधीर आडीवरेकर व दुलारी रांगणेकर यांची प्रभाग पाच मध्ये प्रचारात आघाडी…

⚡सावंतवाडी ता.२६-: भाजपचे सावंतवाडी शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर व दुलारी रांगणेकर यांनी प्रभाग क्रमांक 5 मध्ये जोरदार प्रचार केला. श्री. आडीवरेकर यांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसलेंसह भाजपचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. प्रभाग क्रमांक 5 मध्ये त्यांनी जोरदार प्रचार सुरु केला. श्री. आडीवरेकर म्हणाले, जनतेची साथ आम्हाला आहे. यापुढील जीवन जनतेसाठी समर्पीत करत…

Read Full News

भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे व १७ ही नगरसेवकांनी घेतले खासदार नारायण राणेंचे शुभाशीर्वाद….

⚡कणकवली ता.२६-:कणकवली नगरपंचायत चे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्यासह १७ ही प्रभागातील भाजपच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी भाजप नेते, खासदार नारायण राणे यांची ओम गणेश निवासस्थानी भेट घेऊन निवडणुकीसाठी शुभाशीर्वाद घेतले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाण, कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर,महिला जिल्हाध्यक्ष सौ. कोरगावकर,आदी…

Read Full News

You cannot copy content of this page