⚡सावंतवाडी ता.२६-: भाजपचे सावंतवाडी शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर व दुलारी रांगणेकर यांनी प्रभाग क्रमांक 5 मध्ये जोरदार प्रचार केला. श्री. आडीवरेकर यांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसलेंसह भाजपचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. प्रभाग क्रमांक 5 मध्ये त्यांनी जोरदार प्रचार सुरु केला.
श्री. आडीवरेकर म्हणाले, जनतेची साथ आम्हाला आहे. यापुढील जीवन जनतेसाठी समर्पीत करत असून वचन पूर्ण करण्याची जबाबदारी माझी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
