⚡कणकवली ता.२६-:
कणकवली नगरपंचायत चे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्यासह १७ ही प्रभागातील भाजपच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी भाजप नेते, खासदार नारायण राणे यांची ओम गणेश निवासस्थानी भेट घेऊन निवडणुकीसाठी शुभाशीर्वाद घेतले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाण, कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर,महिला जिल्हाध्यक्ष सौ. कोरगावकर,आदी उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार
समीर अनंत नलावडे यांच्यासह,नगरसेवक पदाचे उमेदवार, राकेश बळीराम राणे ,प्रतीक्षा प्रशांत सावंत ,स्वप्निल शशिकांत राणे, माधवी महेंद्रकुमार मुरकर , मेघा अजय गांगण, स्नेहा महेंद्र अंधारी , सुप्रिया समीर नलावडे ,गौतम शरद खुडकर , मेघा महेश सावंत, आर्या औदुंबर राणे ,मयुरी महेंद्र चव्हाण,मनस्वी मिथुन ठाणेकर ,गणेश उर्फ बंडू हर्णे , सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे ,विश्वजीत विजयराव रासम, संजय मधुकर कामतेकर ,आबिद नाईक आदी सतरा उमेदवार उपस्थित होते.त्याचप्रमाणे भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे व १७ ही नगरसेवकांनी घेतले खासदार नारायण राणेंचे शुभाशीर्वाद….
