आमदार निलेश राणे आज सावंतवाडीत…

खासकीलवाड्यात संध्याकाळी सात वाजता कॉर्नर सभा; काय बोलतील राणे याकडे सावंतवाडीकरांचे लक्ष..

⚡सावंतवाडी ता.२६-: सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत रंगत वाढत असताना आता आमदार दीपक केसरकर व जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या मदतीला शिंदे शिवसेना आमदार निलेश राणे देखील उतरले आहेत. आज सायंकाळी सात वाजता खासकीलवाडा, मांगिरीस बॅकवेट हॉल परिसरात त्यांच्या कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रमुख संजू परब यांनी केले आहे.

निवडणुकीचे मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असताना प्रचारात चुरस वाढली आहे. अशा पार्श्वभूमीवर निलेश राणे यांच्या सभेकडे कार्यकर्त्यांसह मतदारांचेही लक्ष वेधले गेले आहे. सावंतवाडीच्या विकासाबाबत आणि स्थानिक मुद्द्यांवर राणे नेमके काय भूमिका मांडतील, कोणते संदेश देणार याची उत्सुकता शहरात वाढली आहे.

You cannot copy content of this page