लोकराज्य जनता पार्टी पक्षाचे उमेदवार गणेशप्रसाद पारकर यांना मिळाले कपबशी चिन्ह..
कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी शहर विकास आघाडी अंतर्गत क्रांतिकारी विचार पक्षाच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार व नगरसेवकपदाच्या उमेदवारांना नारळ चिन्ह मिळाले आहेत. नगरपंचायत निवडणुकीसाठी १८ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. त्यानंतर २१ नोव्हेंबरपर्यंत माघारीची मुदत होती. या मुदतीनंतर राज्य निवडणूक आयोगाने २५ नोव्हेंबरपर्यंत अपील करण्याची संधी उमेदवारांना दिली होती. अपिलांचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर बुधवारी सकाळी तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या उपस्थितीत उमेदवारांना चिन्ह वाटपाची प्रक्रिया पार पडली.
अशी मिळाली उमेदवारांना चिन्हे
लोकराज्य जनता पार्टी पक्षाचे उमेदवार गणेशप्रसाद पारकर यांना चिन्ह देण्यासाठी चिठ्ठी उडविण्यात आली. यामध्ये गणेशप्रसाद पारकर यांना कपबशी हे चिन्ह मिळाले आहे.
तर शहर विकास आघाडी अंतर्गत क्रांतिकारी विचार पक्षाचे उमेदवार संदेश पारकर व पक्षाच्या नगरसेवकपदाच्या उमेदवारांना नारळ चिन्ह मिळाले आहे. प्रभाग क्रमांक ९ मधील उमेदवार मधुरा मालांडकर – वाळके यांना जग हे चिन्ह मिळाले आहे.
