⚡सावंतवाडी ता.२६-: सावंतवाडी नगरपरिषद निवडणूकीसाठी ७ अपक्षांनी नामनिर्देशन पत्र कायम ठेवल असून आज त्यांना चिन्हांच वाटप करण्यात आल आहे. नगराध्यक्षपदास २, नगरसेवक पदासाठी ५ असे ७ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात असून शहरात अपक्षांचाही मोठा जोर आहे.
यात नगराध्यक्षपदासाठी अन्नपूर्णा कोरगावकर यांना मेणबत्ती व निशाद बुराण यांना बॅट चिन्ह मिळालं आहे. नगरसेवक पदासाठी फरीदा बागवान फुटबॉल, समीऊल्ला ख्वाजा कोट, बबलू मिशाळ नारळ, सुरेश भोगटे नारळ, लतिका सिंग कपबशी चिन्हाच वाटप करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.
