⚡सावंतवाडी ता.२६-: प्रभाग क्रमांक ७ मध्ये उद्वधव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार प्रचारात आघाडी सौ आर्या सुभेदार व श्री संदीप राणे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्याना घरोघरी मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे. संदीप राणे व आर्या सुभेदार नवे चेहरे आहेत. त्यांनी त्याच प्रभागातील दिग्गजांना आव्हान दिले असून त्यांचा मतदारांवर प्रभाव पडत आहे. त्यांनी डोअर टू डोअर प्रचार करण्यावर भर दिली आहे. दोन्ही उमेदवारांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आपली हक्काची माणसे यावेळी निवडून येणार असे शब्द नागरिक देत आहेत. येथील प्रभाग क्रमांक ७ मध्ये पाटबंधारे विभागाचे निवृत्त अधिकारी संदीप राणे व आर्य सुभेदार यांना ठाकरे गटाकडून संधी मिळाली असून प्रचाराचे योग्य नियोजन करत जनतेपर्यंत घरोघरी जोरदार प्रचार सुरू आहे व येथील जनता देखील त्यांच्या पाठीशी खबिर असलेली दिसून येत आहे.
प्रभाग ७ मध्ये ठाकरे गटाच्या आर्या सुभेदार व संदीप राणेंचा प्रचार जोरात…
