आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार शिवापूर येथील शहीद जवानांच्या “रणस्तंभाचे” उद्घाटन…
⚡कुडाळ ता.०६-:देशाच्या रक्षणासाठी शत्रूशी लढता लढता वीरगती प्राप्त झालेल्या कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावातील भारतीय सेनेतील दहा शहीद सुपुत्रांच्या स्मृती प्रित्यर्थ शिवापूर येथे “रणस्तंभ” उभारण्यात आला आहे. या रणस्तंभाचे उद्घाटन ८ मे रोजी सकाळी १० वाजता कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. देशासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या या वीर पुत्रांना सलामी देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे…
