संजू परब यांच्याकडून स्वागत: जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर महेश सारंग यांना धक्का..
⚡सावंतवाडी, ता.११-: आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोलगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील भाजपचे बूथप्रमुख रामचंद्र उर्फ बाळा परब (रा. कुणकेरी) यांनी आज शिंदे गटातील शिवसेनेत पुनर्प्रवेश केला. शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
परब यांच्या या घरवापसीमुळे भाजप तसेच महेश सारंग यांना पुन्हा एकदा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर संजू परब यांनी जोरदार मोर्चेबांधणीला वेग दिला असून विविध घटकांमध्ये पक्ष बांधणीची प्रक्रिया सुरू केली आहे.
