⚡बांदा ता.१५-: सावंतवाडी पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती सुस्मिता जाधव यांनी नुकतीच बांदा येथे भेट दिली. यावेळी शिंदे शिवसेनेचे युवासेना तालुकाप्रमुख रियाज खान यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. स्थानिक कार्यकर्ते व नागरिकांनीही त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करत विविध स्थानिक प्रश्नांवर चर्चा केली.
या भेटीदरम्यान परिसरातील विकासकामे, नागरिकांच्या अडचणी तसेच आगामी योजनांबाबतही उपस्थितांशी संवाद साधण्यात आला. बांदा परिसराच्या विकासासाठी पंचायत समितीमार्फत आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे आश्वासन यावेळी सभापती जाधव यांनी दिले.
यावेळी पांडुरंग नाटेकर, भाऊ वाळके, सागर धोत्रे, प्रसाद पावसकर, सुलेमान शेख, विजय बांदेकर, बाबा धुरी, श्रावणी धुरी, शेर्ले सरपंच प्रांजल जाधव, अनंत बांदेकर आणि भय्या गोवेकर आदी उपस्थित होते.
फोटो:-
बांदा येते सभापती सुस्मिता जाधव यांचे स्वागत करताना रियाज खान. सोबत इतर.
बांद्यात पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव यांचे स्वागत…
