⚡सावंतवाडी ता.११-: मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट मुंबईच्यावतीने धाकोरे (वसवाचे तळे) प्राथमिक शाळेला संगणक भेट देण्यात आला.
धाकोरे वसवाचे तळे प्राथमिक शाळेला आवश्यक असलेल्या संगणकबाबत धाकोरे ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पालव यांनी मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट मुंबई या संस्थेकडे पाठपुरावा केला होता. पालव यांच्या पाठपुराव्याला अनुसरून या संस्थेने शाळेला एक संगणक भेट दिला. यावेळी अमित बने (मुख्य विश्वस्त), संजय देवूळकर, अर्जुन पालव, प्रवीण पालव, सुदर्शन राऊळ, सुनील मुळीक, सुहास कदम,अक्षय सातम, विघ्नेश आपकर, गणेश मोरमारे, शिक्षक अर्जुन रणशूर आदी उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे शिक्षक अर्जुन रणशूर यांनी स्वागत करत मातोश्री सेवाधाम आरोग्य ट्रस्टचे तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पालव यांचे आभार मानले.
मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट मुंबईच्यावतीने धाकोरे शाळेला संगणक भेट…
