⚡वेंगुर्ला ता.१५-: वेंगुर्ला शहरातील एका नव युवा व्यावसायिकाची ( ऑनलाईन गेमिंगद्वारे ) फसवणूक केल्याप्रकरणी वेंगुर्ला पोलिसांनी जलदगतीने तपास करीत दोन संशयितास ताब्यात घेतले होते. यामधील महिलेच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ करण्यात आली होती. तर दुसऱ्या संशयितास न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यामधील कणकवली येथील महिलेस कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिची जामिनावर मुक्तता केली आहे. वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी व पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ला पोलीस पथकाने रत्नागिरी पोलीस पथकाच्या मदतीने शनिवारी या गुन्ह्यातील संबंधित तिसऱ्या संशयितास ( महिलेस) ताब्यात घेतले आहे. वेंगुर्ला पोलीस स्थानकाचे पोलीस हवालदार योगेश सराफदार, महिला पोलीस गौरी ताम्हणेकर, वाहतूक पोलीस अंमलदार मनोज परुळेकर, पोलीस हवालदार जयेश सरमळकर यांच्यासह रत्नागिरी पोलीस पथकाने ही कामगिरी केली आहे. वेंगुर्ला शहरातील संबंधित युवकाने 2 मार्च रोजी सुमारे 9 लाख 90 हजार ची फसवणूक झाल्याची फिर्याद वेंगुर्ला पोलीस स्थानकात दिली होती .त्यानुसार संशयित विरोधात गुन्हा नोंद होऊन वेंगुर्ला पोलिसांनी जलद 12 दिवसात संशयित गुन्हेगारांना ताब्यात घेत कार्यवाही केली आहे.
वेंगुर्ला पोलिसांच्या धडक कारवाईबाबत सिंधुदुर्ग जिल्हाभरातून कौतुक होत आहे.
वेंगुर्ला शहरातील युवा व्यावसायिक फसवणूक प्रकरणी तिसऱ्या संशयितास रत्नागिरी येथून ताब्यात…
