संजू परब आणि माझं नातं हे कधीच तुटणार नाही…

आमदार निलेश राणे: केक कापून वाढदिवस केला उत्साहात साजरा..

⚡सावंतवाडी, ता.१५-:
माझे दिवस चांगले असो, किंवा वाईट, संजू परब नेहमी माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. गेली दहा वर्षे मी राजकारणातून बाजूला पडलो होतो, मात्र संजू परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला पुन्हा राजकारणात सक्रिय केले आणि आमदार होईपर्यंत साथ दिली. त्यामुळे त्यांचे उपकार मी कधीही विसरणार नाही, असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी केले.सावंतवाडी येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संजू परब व त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत राणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

राणे पुढे म्हणाले की, संजू परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून माझा वाढदिवस उत्साहाने साजरा केला आहे. त्यासाठी मला कधीही सांगावे लागत नाही. त्यांनी माझ्यावर ठेवलेले प्रेम असेच कायम राहावे. माझे आणि संजू परब यांचे नाते कधीही तुटणार नाही आणि ते आयुष्यभर तसेच राहील.
तसेच आयुष्यात दिवस मोजत बसायचे नसतात. आपले नाते मरेपर्यंत टिकून राहणार आहे, असेही त्यांनी नमूद केले. सभागृहात मी केलेल्या भाषणाचे अनेकांकडून कौतुक होते; मात्र त्याबद्दल मला विशेष अभिमान वाटत नाही. माझ्या पाठीशी उभे राहणाऱ्या सर्व कार्यकर्ते आणि नेत्यांचे मी मनापासून आभार मानतो, असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठबळामुळेच आज मला सभागृहात काम करण्याची संधी मिळाली असून त्यांचे उपकारही मी कधी विसरणार नाही, असेही राणे यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page