वेंगुर्ला शहरात 8,000 रुपयाची गोवा बनावटी दारू जप्त…

दाभोली गावातही त्वरित धाडसत्र मोहीम हाती..

वेंगुर्ला
वेंगुर्ला पोलिसांनी दारू विक्री विरोधात धडक कारवाई सुरु केली आहे. शनिवारी रात्री 9.30 वा. च्या सुमारास वेंगुर्ला शहरातील बीएसएनएल ऑफिस समोरील रोडवर
8000 रुपयाची गोवा बनावटी दारू जप्त केली आहे. वेंगुर्ला पोलीस स्थानकाचे वाहतूक पोलीस अंमलदार मनोज परुळेकर, पोलीस हवालदार भगवान चव्हाण, प्रथमेश पालकर आदी पेट्रोलिंग करत असताना एक इसम संशयास्पद फिरताना आढळून आला. याप्रकरणी संशयित इसम नीळकंठ संजीवन पेडणेकर (वय 42, रा. कणकवली, मूळ रा. मुंबई ) यास मुद्देमालासह ताब्यात घेत नोटीस बजावण्यात आली आहे. दाखल फिर्यादीनुसार संशयिताविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम (65ई ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भगवान चव्हाण हे करीत आहेत. शासनाने राबविलेल्या ऑलआउट मोहिमेअंतर्गत वेंगुर्ला पोलिसांनी शनिवारी रात्री ते पहाटे संपूर्ण शहरात तसेच तालुक्यात ही मोहीम राबविण्यात आली. तसेच दाभोली ग्रामपंचायत व महिला भगिनींनी दारूबंदी ठराव शासनास सादर केल्यावर वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या उपस्थितीत शनिवारी पूर्ण दिवस दाभोली गावातील संबंधित एरियात धाडसत्र मोहीम हाती घेतली होती . वेंगुर्ला पोलिसांच्या धडक कारवाईमुळे तालुक्यातील संबंधित दारू व्यावसायिक यांचे धाबे दनाणाले आहेत.

You cannot copy content of this page