वाफोली–विलवडे भागात क्वारी-क्रशर विरोधात उद्या धरणे आंदोलन…

⚡बांदा ता.१६-: वाफोली–विलवडे परिसरात सुरू असलेल्या विनापरवानगी क्वारी व क्रशर प्रकल्पांच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यासाठी उद्या मंगळवार, दि. १७ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता वाफोली-विलवडे सीमेजवळील क्रेशर रोड येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कृती समितीच्या वतीने गुणेश गवस यांनी दिली आहे.
वाफोली व विलवडे या दोन्ही गावांतील नागरिकांनी संयुक्तपणे हा लढा उभारला असून परिसरातील निसर्ग, वन्यजीव, जैवविविधता तसेच भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या धोक्याचा विचार करून अशा विनाशकारी प्रकल्पांना विरोध केला जात आहे. क्वारी-क्रेशरमुळे परिसरातील पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर वाफोली-विलवडे भागातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. “आता नाही तर कधी नाही” असा निर्धार व्यक्त करत परिसरातील हरित वातावरण आणि जैवविविधता जपण्यासाठी हा संयुक्त लढा उभारण्यात आल्याचे समितीने सांगितले आहे.

You cannot copy content of this page