गुरु मठकर यांचा उपक्रम:उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून कौतुक…
सावंतवाडी ता.१६: आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी गुरु मठकर यांनी ४० गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप केले. समाजाभिमुख उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा करण्याची परंपरा त्यांनी कायम ठेवत यंदाही हा उपक्रम राबविला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरु मठकर यांनी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत विद्यार्थ्यांना सायकली प्रदान केल्या. या सायकलींमुळे अनेक विद्यार्थ्यांना शाळेत जाणे सुलभ होणार असून त्यांच्या शिक्षणाला मदत होणार आहे.गुरु मठकर यांच्या या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी आमदार निलेश राणे यांनीही गुरु मठकर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
