मठ टाकयेवाडी येथील धोकादायक स्थितीमुळे वाहनास धोका…

⚡वेंगुर्ला ता.१६-: वेंगुर्ला मठमार्गे कुडाळ – सावंतवाडी कडे जाणाऱ्या मार्गांवर मठ एरियात अंडरग्राउंड विजवाहिन्याचे काम सुरु आहे. काम व्यवस्थित झाले असले तरी बऱ्याचशा त्रुटी राहिल्या असल्याने ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदार – सबठेकेदार यांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान मठ टाकयेवाडी येथील धोकादायक वळणावर अपुऱ्या कामामुळे धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या चार दिवसात वाहने घसरून किरकोळ अपघात झाले असून काल रविवारी रात्री दोन दुचाकीचालकांना याचा फटका बसला आहे. याबाबत मात्र संबंधित प्रशासन येथील गंभीर बाबिकडे कानाडोळा करीत असून ठेकेदाराचे लाड ? होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. मठ हायस्कुलनजिक वेस्टेज टाकण्यात आले असून विद्यार्थ्यांना इजा झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल व्यक्त करण्यात आला आहे.या वेस्टेज बाबत मठ गावठणवाडी येथील शिवसेना पदाधिकारी उमेश नाईक यांनी मठ ग्रामपंचायत सरपंच यांना कल्पना दिली आहे. दरम्यान मठ टाकयेवाडी येथे रात्री – अपरात्रीचे गंभीर अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने त्वरित लक्ष पुरवावे, अशी मागणी वाहधारकातुन करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page