⚡सावंतवाडी ता.१६- : जिल्हा परिषद अध्यक्षपदी प्रमोद कामत यांचे नाव निश्चित झाल्यानंतर सावंतवाडी येथे त्यांच्या समर्थकांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष करत कामत यांना शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी सावंतवाडी भाजपचे नगरसेवक तथा सभापती सुधीर आडीवरेकर तसेच भाजप सावंतवाडीचे सरचिटणीस दिलीप भालेकर यांनी प्रमोद कामत यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
तसेच उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
यावेळी अनेक कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
