अध्यक्ष पदासाठी प्रमोद कामत, उपाध्यक्ष पदासाठी दादा साईल यांचे अर्ज दाखल…

ओरोस ता १६
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी महायुतीच्यावतीने बांदा जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आलेल्या भाजपच्या प्रमोद कामत यांनी अध्यक्ष पदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे. तर उपाध्यक्ष पदासाठी शिवसेना पक्षाचे सदस्य तुकाराम उर्फ दादा साईल यांनी अर्ज दाखल केला आहे. दुपारी ३ वाजता खास सभेद्वारे या दोन्ही पदांची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काका कुडाळकर, संदीप मेस्त्री, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजय पडते यांच्यासह महायुतीचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page