सावंतवाडी : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा आरोंदा नं. १ मध्ये शैक्षणिक उठावातून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना चंदगड येथील निंगोजी पाटील यांच्यावतीने स्पोर्ट्स ड्रेस देण्यात आले.
या स्पोर्टचे ड्रेसचे वितरण आरोंदा सरपंच सायली साळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गणपत गावडे, निंगोजी कोकितकर, विलास आवडण, ऋतुजा राणे, नूतन निउंगरे आदी उपस्थित होते. चंदगड तालुक्यातील गुडेवाडी येथील निंगोजी पाटील हे लक्ष्मी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस कोल्हापूर या कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. शाळेच्यावतीने निंगोजी पाटील यांचे आभार मानण्यात आले.
आरोंदा शाळेतील विद्यार्थ्यांना चंदगड येथील निंगोजी पाटील यांच्यावतीने स्पोर्ट्स ड्रेस…
