शिरोडा ते आजगाव खाजणादेवी मार्ग रस्ता काँक्रीटीकरण चे भूमिपूजन…

⚡सावंतवाडी ता.१५-: आमदार दीपक केसरकर यांच्या आमदार निधीतून मंजूर झालेल्या सुमारे दहा लाख रुपयांचे शिरोडा जाधववाडी ते आजगाव जाधववाडी खाजणादेवी मार्गाचे रस्ता काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी येथील ग्रामस्थांनी आमदार केसरकर व उपस्थित लोकप्रतिनिधींचे आभार मानून समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमावेळी पंचायत समिती सदस्य नेहा कांबळी,सरपंच प्रियांका सावंत, उपसरपंच संदेश केरकर ,शाखा प्रमुख अनिल केरकर, पोलीस पाटील लवू रगजी ,अशोक केरकर, सुनील पेडणेकर, जयवंत मयेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page