⚡सावंतवाडी ता.१५-: येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित, कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय प्रशालेतील इयत्ता सहावी व सातवीतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष -२०२५-२६ या कालावधीत झालेल्या सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी दोन सुवर्ण पदक, तीन रौप्य पदक व चार कास्य पदक मिळून नऊ पदकांची कमाई केली आहे.
परीक्षेत सहावीच्या ७ व विद्यार्थ्यांनी सातवीच्या १४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात इयत्ता सहावीच्या वर्गातील स्वरा अभय वाटवे १४० (रौप्य पदक), समृद्धी नरेंद्र होडावडेकर ११२ (कास्य पदक ), आरुष विठोबा परब ११४ (कास्य पदक), तर इयत्ता सातवीतील अवनी रामनाथ बावकर-१७० (सुवर्ण पदक), जिज्ञासा मधुकर देसाई-१५६ (सुवर्ण पदक), दूर्वा अतुल केसरकर १३२ (रौप्य पदक), योगी मेघनाथ लेले १३८ (रौप्य पदक), चैतन्या कृष्णा पास्ते १२० (कास्य पदक), सानवी रवींद्र सावंत-१२४ (कास्य पदक ) प्राप्त करून घवघवीत यश मिळविले आहे. तर परीक्षेत बसलेले इतर सहभागी विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना जी. बी. गवस व श्री पी. बी. बागुल यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशालेचे व संस्थेचे अध्यक्ष शैलेश पई, सचिव प्रसाद नार्वेकर, संस्थेचे संचालक मंडळ, प्रशालेचे मुख्याध्यापक सूर्यकांत भुरे, पर्यवेक्षक सुबोध वराडकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद गोठोसकर, प्रशालेचे शिक्षक वृंद, शिक्षकेतर वृंद,पालक यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत कळसुलकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश…
