तातडीने नेटवर्क सुरळीत करा…

..अन्यथा बीएसएनएल कार्यालयाला टाळे ठोकू;बुराव धुरी यांचा इशारा..

⚡दोडामार्ग ता.१५-: जर तातडीने नेटवर्क सुरळीत झाले नाही तर ‘बीएसएनएल’ जिल्हा प्रबंधक यांच्या कार्यालयाला टाळे ठोकणार असे शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी सांगितले. संबंधित अधिकाऱ्यांना ग्राहकांची पर्वा नाही त्यामुळे संबंधित अधिकारी यांनी ही धमकी समजावी किंवा इशारा पण नेटवर्क सुरळीत करावे असेही श्री. धुरी यांनी माध्यमाना माहिती देताना सांगितले.

श्री. धुरी म्हणाले, शासन प्रत्येक काम ऑनलाईन करा म्हणते. धान्य घ्यायला गेल्यावरही यांना थम लागतो मात्र गावातील सोडा शहरात बोलायला बीएसएनएल चे नेटवर्क नाही. ग्रामस्थ आणि ग्राहक हैराण झाले आहेत. अधिकारी वर्ग नेटवर्क गेल्यानंतर आरामात राहतो. बीएसएनएल चे मनुष्यबळ वाढवा किंवा अन्य काही करा येत्या काही तासात नेटवर्क सुरळीत झाले नाही तर अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही

You cannot copy content of this page