पेंडूर येथील श्री कुलदेव विद्यामंदिर जि.प. प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीसाठी मोलाची मदत; सुविधायुक्त वातावरणात शिक्षणाला मिळणार चालना..
⚡वेंगुर्ल ता. २७-: विद्यार्थ्यांना सुरक्षित व चांगल्या वातावरणात शिक्षण मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र भाजप युवा नेते विशाल परब यांनी पेंडूर येथील श्री कुलदेव विद्यामंदिर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीसाठी मोलाची मदत केली आहे.
शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीची आवश्यकता लक्षात घेऊन ही मदत देण्यात आली. या मदतीमुळे शाळेतील आवश्यक दुरुस्तीची कामे वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांना अधिक सुरक्षित, स्वच्छ व सुविधायुक्त वातावरणात शिक्षण घेता येणार आहे.
यावेळी अॅड. उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर, केतन आजगावकर, पेंडूरचे सरपंच संतोष गावडे, उपसरपंच मिलिंद गावडे, तंटामुक्ती अध्यक्ष उमेश सावंत, विकास परब, तालुका चिटणीस धिरेंद्र म्हापसेकर, गोविंद साटेलकर (बूथ अध्यक्ष) तसेच बंटी जामदार (शक्ती केंद्र प्रमुख) आदी मान्यवर उपस्थित होते.
शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी करण्यात आलेल्या या मदतीचे ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापनाकडून स्वागत करण्यात आले.
