ओरोस खर्येवाडी येथे उद्या तिरंगी भजन डबलबारी…

ओरोस ता ११-: श्री देव शिवारी प्रासादिक भजन व मित्र मंडळ ओरोस खर्येवाडी आयोजित गुरुवर्य काशीराम परब बुवा यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवार 12 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता २०- २० तिरंगी डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे.

बुवा विजय उर्फ गुंडू सावंत श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ वर्दे कुडाळ विरुद्ध बुवा समीर महाजन श्री देवी भगवती प्रासादिक भजन मंडळ मुणगे (आडवळवाडी) विरुद्ध बुवा शंकर उर्फ आनंद कानडे श्री.रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ घावनळे (खुटवळवाडी) या तीन बुवांमध्ये तिरंगी डबलबारी भजनाचा सामना होणार आहे. हा कार्यक्रम ओरोस खर्येवाडी हॉटेल साईधाम नजीक येथे होणार आहे.

You cannot copy content of this page