⚡कुडाळ ता.११-: कुडाळ तालुक्यातील गोवेरी भगतवाडी साकवासाठी आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार जिल्हा वार्षिक योजनेतून 30 लाखांचा निधी मंजूर झाला असून याबाबत आमदार निलेश राणे यांनी गोवेरीवासीयांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे.
याबाबत शिवसेना पदाधिकारी तथा माजी जि. प. अध्यक्ष संजय पडते, शिवसेना तालुकाप्रमुख विनायक राणे, दीपक नारकर यांनी आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
