‘गणित प्रज्ञा’ गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा १४ रोजी सत्कार…

⚡मालवण ता.११-:
महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळाशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळा तर्फे सन २०२४- २५ मधील गणित प्रज्ञा स्पर्धेत गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दि. १४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता, बॅरिस्टर नाथ पै सभागृह (कुडाळेश्वर मंदिर शेजारी), कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे.

सन २०२४-२५ या वर्षी इयत्ता ५ वी तील ३२ विद्यार्थी, इयत्ता ८ वी तील २२ विद्यार्थी, तसेच इयत्ता १० वी पारंगत परीक्षेत जिल्ह्यात प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थी अशा एकूण ५७ गुणवंत विद्यार्थ्यांचा या सोहळ्यात सत्कार करण्यात येणार आहे. गुणवंतांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाईल.

गणित विषयातील प्राविण्य, कौशल्य आणि तार्किक विचारसरणी वाढीस लागावी तसेच विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रसाद कुबल यांनी सांगितले. या कार्यक्रमास गणित क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून, गुणवंत विद्यार्थ्यांनी व पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष श्री. प्रसाद कुबल यांनी केले आहे.

You cannot copy content of this page