पिंगुळी-भूपकारवाडी येथे १४ पासून हरिनाम सप्ताह…

⚡कुडाळ ता.११-: प्रती वर्षा प्रमाणे श्री देव महापुरुष मंदिर, भूपकरवाडी पिंगुळी येथे श्री देव महापुरुष सेवा मंडळाच्या वतीने १४ डिसेंबर ते १६ डिसेंबर दरम्यान वार्षिक हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
श्री देव महापुरुष मंदिर भूपकरवाडी पिंगुळी येथे रविवार दिनांक १४ डिसेंबर २०२५ ते मंगळवार दिनांक १६ डिसेंबर २०२५ या कालवधीत विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी पिंपळपार नूतनीकरण वर्धापन दिन सकाळी १०.१५ ते ११.३० या वेळेत एकादशणी अभिषेक, इ. धार्मिक विधी रात्रौ ९.०० वाजता जीवन विद्या मिशन शाखा कुडाळ यांचा सार्थ हरिपाठ कार्यक्रम, सोमवार दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.१५ वाजता धार्मिक विधीने हरीनाम साप्ताह प्रारंभ होईल सायंकाळी ६.०० वाजलेपासून सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम, मांगळावर दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.१५ वाजता हरीनाम सप्ताह सांगता, पालखी प्रदक्षिणा, आरती, प्रसाद दुपारी १.३० ते ३.०० या वेळात महाप्रसाद इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा आवाहन श्री देव महापुरुष सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page