सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी डॉ. अपूर्वा बासूर रुजू
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून स्वागत सिंधुदुर्ग दि.07 : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांनी पदभार स्वीकारला आहे. जिल्हा परिषद मुख्यालयात त्यांनी प्रशासकीय कामकाजाची सूत्रे हाती घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्ह्यात त्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले. तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील खातेप्रमुखांनी तसेच…
