Headlines

Global Maharashtra Breaking News

कणकवली तालुका प्रवासी संघाकडून गणेशभक्त प्रवाशांचे ११ सप्टेंबरला स्वागत कार्यक्रम

कणकवली : गणेशोत्सवानिमित्त कोकणात मोठ्या संख्येने येणाºया गणेशभक्त प्रवाशांचे कणकवली तालुका प्रवासी संघाच्या वतीने स्वागत कार्यक्रम ११ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता पटवर्धन चौक कणकवली येथे आयोजित करण्यात आला आहे. एसटी बस, रेल्वे तसेच खासगी बसमधून कोकणात येणाºया प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी प्रवासी संघाकडून चालक व प्रवासी यांना पत्रके वाटुन जनजागृती…

Read Full News

कुडाळ वनरक्षक मारहाण प्रकरणात तिघांची निर्दोष मुक्तता…

⚡कुडाळ ता.०८-: कुडाळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ६५/२०१८ मधील वनरक्षकाला मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणात सिंधुदुर्ग जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.दि. २ मार्च २०१८ रोजी कालेली जंगल परिसरात गस्तीवर असताना वनरक्षक सुनील शिवाजी भंडारे यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी मधुकर रामचंद्र परब…

Read Full News

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांसमोर सिंधुदुर्गातील प्रश्नांचा पाढा…

सिंधुदुर्ग उपकेंद्रातूनच सर्व शैक्षणिक सेवा द्या:मंदार शिरसाट यांची निवेदनातून मागणी.. ⚡कुडाळ ता.०८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित शैक्षणिक व प्रशासकीय समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक मंदार शिरसाट यांनी मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांना सविस्तर निवेदन दिले. विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे सिनेट सदस्य, विद्यार्थी, प्राध्यापक व…

Read Full News

घारपी शाळेत विद्यार्थ्यांनी अनुभवली शिक्षक होण्याची अनोखी दुनिया

शिक्षक दिन व आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त ‘एक दिवस विद्यार्थी शिक्षक’चा अनोखा उपक्रम बांदा ता.०८ भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्त्वज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त देशभर शिक्षक दिन साजरा केला जातो. तसेच ८ सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन म्हणून साजरा केला जातो. या दोन्ही दिवसांचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपी येथे विद्यार्थ्यांनी…

Read Full News

मोपा विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तीन जिवंत काडतुसे; सुरक्षा तपासणीत खळबळ…

⚡बांदा ता.०८-: मोपा गोवा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा तपासणीदरम्यान एका प्रवाशाच्या सामानात तीन जिवंत काडतुसे आढळल्याने खळबळ उडाली. संबंधित प्रवाशाकडे ही काडतुसे बाळगण्यासाठी आवश्यक वैध परवाना तसेच विमानातून ती वाहून नेण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी नसल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली.ही घटना ७ सप्टेंबर रोजी सकाळी १०.४८ वाजता मोपा…

Read Full News

रोटरी क्लब कुडाळकडून १० गुणवंत शिक्षकांचा गौरव

शिक्षक दिनाचे औचित्य ⚡कुडाळ ता.०८-: शिक्षक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या वतीने कुडाळ तालुक्यातील अंगणवाडी सेविकांपासून ते महाविद्यालयीन स्तरावर कार्यरत असलेल्या १० गुणवंत शिक्षकांचा ‘द नेशन बिल्डर अवॉर्ड’ देऊन गौरव करण्यात आला. संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे हा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.यावेळी कुडाळ हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक काशिनाथ सामंत यांनी, “शिक्षकांचा…

Read Full News

प्रा. अजित व्हनमाने रोटरीच्या ‘नेशन बिल्डर’ पुरस्काराने सन्मानित..

सलग तीन वर्षे जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी घडविणारे शिक्षक:अजित व्हनमाने यांची २४ वर्षांची ज्ञानसेवा.. कुडाळ : कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचे वाणिज्य शाखेतील बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी विषयाचे शिक्षक अजित काशिनाथ व्हनमाने यांनी आपल्या २४ वर्षांच्या अध्यापन सेवेत उल्लेखनीय शैक्षणिक कार्य करत विद्यार्थ्यांच्या यशात मोलाचे योगदान दिले आहे. नुकताच त्यांचा रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या वतीने मानाचा…

Read Full News

१६ बैलांची अवैध वाहतूकीवर पोलिसांची कारवाई

आयशर टेम्पोसह पायलटिंग करणारी इनोव्हा जप्त; सहा जणांविरुद्ध गुन्हा कणकवली : देवगडहून कोल्हापूरच्या दिशेने १६ जनावरांची अवैध वाहतूक करणारा आयशर टेम्पो तरेळे येथे पकडण्यात आला. या टेम्पोमध्ये चारापाणी न देता दाटीवाटीने बांधलेल्या अवस्थेत १६ बैल आढळून आले. या कारवाईत पोलिसांनी जनावरांसह आयशर टेम्पो आणि त्याला पायलटिंग करणारी इनोव्हा कार ताब्यात घेतली. याप्रकरणी टेम्पो चालकासह इनोव्हा…

Read Full News

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बांद्यात महामार्गाची पाहणी

बांदा/प्रतिनिधीगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी आज बांदा येथे महामार्गाची तसेच अवजड वाहतूक पार्किंगच्या जागेची पाहणी केली. गणेशोत्सव काळात वाहतूक सुरळीत राहावी आणि नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी त्यांनी पोलीस प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्या.गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होत असल्याने महामार्गावरील वाहतुकीत मोठी वाढ होते. तसेच अवजड…

Read Full News

*जिल्ह्यातील कृषी जैवविविधता लोकसहभागातून टिकविण्याची गरज…

उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे:युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम ज्ञानविनिमय कार्यशाळा.. ⚡सिंधुदुर्ग, ता.०७- : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समृद्ध कृषी जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी लोकसहभागातून प्रभावी प्रयत्न करण्याची गरज असून, शेतकरी आणि स्थानिक समुदायाच्या सक्रिय सहभागातून जैवविविधतेचे संवर्धन व व्यवस्थापन करण्यावर भर देण्यात यावा असे आवाहन उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे यांनी केले. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या (यूएनडीपी सिंधुदुर्ग) सहकार्याने जिल्हाधिकारी कार्यालयात सिंधुनीती…

Read Full News

You cannot copy content of this page