Headlines

Global Maharashtra Breaking News

शिक्षकांचे विविध प्रश्न न सुटल्यास बेमुदत साखळी आंदोलन…

प्राथमिक शिक्षक समितीचा इशारा.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०२-: गेल्या वर्षात प्राथमिक शिक्षकांचे विविध प्रश्न प्रलंबित राहिले असून सदर प्रश्न ५ जानेवारी २०२६ पर्यँत न सोडविले गेल्यास ७ जानेवारी २०२६ पासून जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे दालनासमोर बेमुदत साखळी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्राथमिक शिक्षक समितीने दिला आहे.माहे ऑगस्ट २०२६ मध्ये संघटनेने आंदोलनाची नोटीस प्रशासनाला दिली…

Read Full News

तळेकर मंदिराच भूमीपूजन सोहळा विशाल परब यांच्या हस्ते उत्साहात संपन्न…

⚡सावंतवाडी ता.०२-: तळेवाडी येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या तळेकर मंदिराचा भूमीपूजन सोहळा अत्यंत उत्साही आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. या मंगलप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे युवा नेते विशालजी परब यांच्या शुभहस्ते भूमीपूजन करण्यात आले. तळेवाडीच्या विकासकामांत आणि सामाजिक कार्यात विशालजी परब यांचे नेहमीच सहकार्य लाभत असल्याने, ग्रामस्थांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.विशालजी परब यांच्या हस्ते विधीवत पूजा…

Read Full News

कारिवडे येथे भाजपचे उपसरपंचपदी महेश गावकर यांची बिनविरोध निवड…

भाजप युवा नेते विशाल परब यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन व सत्कार.. ⚡सावंतवाडी ता.०२-: कारिवडे येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी महेश गावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गावच्या विकासासाठी आणि तरुणांच्या संघटनासाठी नेहमी तत्पर असणाऱ्या गावकर यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या निवडीनंतर भाजपचे युवा नेते महाराष्ट्र राज्य विशालजी परब यांनी नवनिर्वाचित उपसरपंच महेश गावकर यांची भेट…

Read Full News

वराडकर हायस्कूलच्या १९८१–८२ दहावी बॅचचे स्नेहसंमेलन उद्या…

⚡मालवण ता.०२-:शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (संयुक्त )कट्टा च्या १९८१-१९८२ सालच्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन शनिवार दिनांक ३ जानेवारी रोजी सकाळी साडे आठ वाजता ते साडे बारा वाजता या कालावधीत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (संयुक्त)येथे संपन्न होणार आहे.कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर…

Read Full News

मोरेश्वरवाडीत नळपाणी पुरवठा सुरळीत; नगरसेवक तपस्वी मयेकर यांच्या ठोस प्रयत्नांना यश…

⚡मालवण ता.०२-:गेल्या काही दिवसापासून बंद अवस्थेत असलेल्या मालवण नगरपालिका प्रभाग क्रमांक दहा मधील मोरेश्वरवाडी परिसरात पिण्याच्या पाण्याच्या नळपाणी योजनेचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात या भागाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी केलेल्या ठोस प्रयत्नामुळे यश आले असून या भागात पाणीपुरवठा सुरळीत झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे मालवण नगरपालिका प्रभाग क्रमांक…

Read Full News

नववर्षानिमित्त ठाकरे शिवसेनेतर्फे मालवणमध्ये ख्रिस्ती बांधवांना कॅलेंडर वाटप

मालवण दि प्रतिनिधी मालवण नगरपरिषदेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नगरसेवक मंदार ओरसकर यांच्या पुढाकारातून ठाकरे शिवसेनेच्या वतीने नववर्षानिमित्त ख्रिस्ती बांधवाना कॅलेंडर देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ठाकरे शिवसेनेच्या नगरसेविका अनिता गिरकर, नगरसेवक महेंद्र म्हाडगूत, शहरप्रमुख बाबी जोगी, रवी मिटकर, काँग्रेसचे शहरप्रमुख जेम्स फर्नांडीस यांच्यासह अन्य पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Read Full News

न्हावेली येथे ३ व ४ जानेवारी रोजी “न्हावेली प्रीमियर लीग २०२६” चे आयोजन…

क्रीडा प्रेमींनी उपस्थित राहण्याचे मंडळाच्या वतीने आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.०२-: न्हावेली चौकेकरवाडी येथील कुंभारभाट मैदानावर शनिवार दिनांक ३ व रविवार दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी न्हावेली प्रीमियर लीग २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.या क्रिकेट सामन्यातील विजेत्या संघाला रुपये २०,०००/- (नितीन पालेकर पुरस्कृत) उपविजेत्या संघाला रुपये १५०००/- (श्रीशा इलेक्ट्रिकल – बांदेश्वर इलेक्ट्रिकल पुरस्कृत) तर स्वामी सेल्स…

Read Full News

कुडाळ बाजारपेठेतील रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात…

⚡कुडाळ ता.०२-: गेल्या अनेक दिवसांपासून कुडाळ बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने या मार्गाची मोठी दुर्दशा झाली होती. मात्र, कुडाळ नगरपंचायतीने अखेर या समस्येची गंभीर दखल घेत रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेतले आहे. आज शुक्रवारपासून या मुख्य मार्गाच्या डांबरीकरणाच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात करण्यात आली आहे.कुडाळमध्ये दर शुक्रवारी बाजारपेठ बंद असते. रस्त्यावर वर्दळ कमी असल्याने प्रशासनाने…

Read Full News

आरोस दांडेली येथील माऊली कर्णबधिर व मतिमंद निवासी विद्यालयास बँक ऑफ इंडिया कडून शैक्षणिक साहित्य…

⚡सावंतवाडी ता.०२-: आरोस दांडेली येथील माऊली कर्णबधिर व मतिमंद निवासी विद्यालयास बँक ऑफ इंडिया शाखा मळेवाड यांच्या कडून शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी शाळेच्या वतीने उपस्थित बँक ऑफ इंडिया चे शशांक पाटील,कर्मचारी प्रकाश तळवणेकर ,ग्रामस्थ संतोष गावडे यांचे शाळेच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी विद्यालयातील शिक्षक,कर्मचारी उपस्थित होतेयावेळी शाळेच्या वतीने बँक…

Read Full News

सावंतवाडी नगरपरिषदे जवळच कचऱ्याचा साम्राज्य पसरल्याने नगरसेवक देव्या सूर्याजी यांची नाराजी…

⚡सावंतवाडी ता.०२-: नगरपरिषदेच्या १०० मीटर अंतरावर असलेल्या भागात कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘मिनी कचरा डेपो’ इथे तयार झाल्याचा आरोप त्यांनी केला असून तातडीने यावर कार्यवाही करावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. नगरसेवक श्री. सुर्याजी म्हणाले,बाजारपेठेलगत सालईवाडा येथील वर्दम, नेवगी, भांबुरे घरामागील असणाऱ्या ओहोळावरील रस्त्यावर कचऱ्याचे…

Read Full News

You cannot copy content of this page