न्हावेली येथे ३ व ४ जानेवारी रोजी “न्हावेली प्रीमियर लीग २०२६” चे आयोजन…

क्रीडा प्रेमींनी उपस्थित राहण्याचे मंडळाच्या वतीने आवाहन..

⚡सावंतवाडी ता.०२-: न्हावेली चौकेकरवाडी येथील कुंभारभाट मैदानावर शनिवार दिनांक ३ व रविवार दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी न्हावेली प्रीमियर लीग २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.
या क्रिकेट सामन्यातील विजेत्या संघाला रुपये २०,०००/- (नितीन पालेकर पुरस्कृत) उपविजेत्या संघाला रुपये १५०००/- (श्रीशा इलेक्ट्रिकल – बांदेश्वर इलेक्ट्रिकल पुरस्कृत) तर स्वामी सेल्स सावंतवाडी व सगुण नाईक यांच्या वतीने प्रथम व द्वितीय चषक तसेच वैयक्तिक बक्षिसे असून,यात प्रत्येक सामन्यातील सामनावीर ट्रॉफी संतोष उर्फ बाळू पार्सेकर पुरस्कृत ,उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी राज धवण पुरस्कृत,उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी कृष्णा धवण पुरस्कृत ,मालिकावीर ट्रॉफी राज व कृष्णा धवण पुरस्कृत तसेच क्रिकेट सामन्यासाठी लागणारे बॉल्स अंकित घोगळे यांनी पुरस्कृत केले आहेत.
या लीग मध्ये शिवबाचा छावा, श्री राम वॉरियर्स, अष्टविनायक स्पोर्टस, आई माऊली ,अनिष किंग स्टार ११ ,स्वामी ११ हे संघ खेळणार असून,या प्रीमियर लीग साठी सर्व क्रीडा प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page