Headlines

Global Maharashtra Breaking News

आडेली खुटवळवाडी येथील क्रिकेट स्पर्धेतए. ए. सँडी स्पोर्ट्स आरवली संघ विजेता…

राजू टायगर आरोंदा संघ उपविजेता : मित्रप्रेम मंडळाचे आयोजन.. ⚡वेंगुर्ला ता.०४-: वेंगुर्ला तालुक्यातील आडेली खुटवळवाडी येथे मित्रप्रेम कला – क्रीडा मंडळातर्फे आयोजित व पुरस्कृत करण्यात आलेल्या तीन दिवसीय भव्य क्रिकेट स्पर्धेत ए. ए. सँडी स्पोर्ट्स आरवली संघाने विजेतेपद पटकाविले. तर राजू टायगर आरोंदा संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेत एकूण 16 नामांकित संघांनी सहभाग घेतला.आज रविवारी…

Read Full News

समाजातील चांगल्या कामाची दखल घेणारी पत्रकारिता आवश्यक…

उमेश तोरसकर:मालवण तालुका पत्रकार समितीचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात.. मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुका पत्रकार समितीने समाजातील विविध घटकांचे सन्मान करताना चांगल्या कामाची पोचपावती दिली आहे. पत्रकारांनी समाजाचा आरसा बनताना सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम आपल्या लेखणीतून करावे. मालवण तालुक्यातील पत्रकारांच्या पाठीमागे जिल्हा पत्रकार संघ कायम असेल, असे प्रतिपादन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यानी…

Read Full News

पत्रकारांच्या कला-संवेदनशीलतेचा गणेश सजावट स्पर्धेतून प्रत्यय…

डॉ. दीपक परब: पत्रकार सदस्यांसाठी आयोजित गणेश सजावट स्पर्धा मसुरे येथे संपन्न.. ⚡मालवण ता.०४-:पत्रकार हे संस्कृती जपणारे आणि कला संवेदनशील मनाचे लोक असतात याचा प्रत्यय पत्रकार समितीने आयोजित केलेल्या गणेश सजावटीच्या स्पर्धेतून आला असल्याने मालवण तालुका पत्रकार समितीने पत्रकार बांधवांसाठी घेतलेली गणेश सजावट स्पर्धा कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन मसुरे चांदेर गावचे सुप्रसिद्ध उद्योजक डॉ श्रीकृष्ण…

Read Full News

सावंतवाडीचा अभिमान; कु. कबीर हेरेकरने वयाच्या दहाव्या वर्षी ५० मॅरेथॉनचा टप्पा केला पार…

⚡सावंतवाडी ता.०४-:“उंची लहान, पण किर्ती महान” या वाक्प्रचाराचा प्रत्यय सावंतवाडी येथील शांतिनिकेतन इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी कु. कबीर नवीद हेरेकर याने खऱ्या अर्थाने समाजाला दिला आहे. अवघ्या दहाव्या वर्षी कबीरने तब्बल ५० मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग घेत सर्व स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.आज, ४ जानेवारी रोजी, गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन…

Read Full News

श्री दत्तक्षेत्र आशियेमठ पुरातन दत्त मंदिरात अतिरुद्र स्वाहाकार सोहळा…

९ दिवस धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम : शोभायात्रेने स्वाहाकाराचा प्रारंभ:समिती अध्यक्ष विलास खानोलकर यांची माहिती.. ⚡कणकवली ता.०४-: आशिये मठ येथील श्री दत्तक्षेत्र ५६७ वर्षांच्या पुरातन दत्त मंदिरात २५ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत सकलजनकल्याणार्थ अतिरुद्र स्वाहाकार महाअनुष्ठानाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नेपाळच्या ग्रामीण भागातून…

Read Full News

थोड्या वेळात खासदार नारायण राणे, पालकमंत्री ना. नितेश राणे आणि आ. निलेश राणे सभास्थळी पोहोचणार…

पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी ;साहेब…..नारायण राणे” हे गाणे वेधतेय सर्वांचे लक्ष ⚡कणकवली ता.०४-: खासदार नारायण राणे यांच्या कणकवली येथील सभेस्थळी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. अगदी थोड्या वेळात खासदार नारायण राणे, पालकमंत्री नाम. नितेश राणे, आमदार निलेश राणे कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील पटांगणावर सभास्थळी दाखल होणार आहेत. सभेस्थळी असलेल्या खुर्च्या देखील भरून गेल्या होत्या. दरम्यान…

Read Full News

बांदा सटमटवाडीत जलवाहिनी फुटल्याने पाण्याची नासाडी…

ग्रामस्थांचा केळीचे झाड लावून अनोखा निषेध:तातडीची दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा.. ⚡बांदा ता.०४-: बांदा सटमटवाडी येथे महामार्गालगत जलजीवन मिशन अंतर्गत टाकण्यात आलेली जलवाहिनी फुटल्याने गेल्या काही दिवसांपासून दररोज हजारो लिटर पाणी अक्षरशः वाया जात आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे संबंधित ठिकाणी मोठा खड्डा पडला असून या मार्गावरून ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांसह वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे….

Read Full News

भाजप खासदार नारायण राणेंचे बांदा येथे जंगी स्वागत…

शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्याकडून देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत.. ⚡सावंतवाडी ता.०४-:भाजप खासदार मा. नारायणराव राणे हे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असून, त्यांच्या आगमनानिमित्त बांदा येथे भव्य व जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन खासदार नारायण राणे यांचे स्वागत केले. राणे यांच्या स्वागतासाठी जिल्ह्याच्या विविध…

Read Full News

खासदार नारायण राणे यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्ते व गाड्यांचा ताफा सज्ज…

*पत्रा देवी ते बांदा अशा लांबच लांब गाड्यांच्या लागल्या रांगा:कार्यकर्त्यांमध्ये अपूर्व उत्साह, काही वेळातच खासदार राणेंचे होणार भव्य स्वागत. ⚡बांदा ता.०४-: खासदार नारायण राणे त्यांच्या स्वागतासाठी बांदा येथे समर्थक कार्यकर्त्यांचा प्रचंड जनसमुदाय जमला असून काही मिनिटातच खासदार नारायण राणे यांचे आगमन सिंधुदुर्ग हद्दीत होणार आहे. सुमारे दोन किलोमीटर पेक्षा जास्त अंतरात गाड्यांची रांग उभी करण्यात…

Read Full News

सावंतवाडी उपविभागीय अधिकारी कार्यालय इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न…

⚡ सावंतवाडी ता. ०४-: महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागांतर्गत सावंतवाडी येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन आज पालकमंत्री नितेश राणे व आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच विभागातील सर्व अधिकारी, नगरसेवक आणि पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Full News

You cannot copy content of this page