आडेली खुटवळवाडी येथील क्रिकेट स्पर्धेतए. ए. सँडी स्पोर्ट्स आरवली संघ विजेता…

राजू टायगर आरोंदा संघ उपविजेता : मित्रप्रेम मंडळाचे आयोजन..

⚡वेंगुर्ला ता.०४-: वेंगुर्ला तालुक्यातील आडेली खुटवळवाडी येथे मित्रप्रेम कला – क्रीडा मंडळातर्फे आयोजित व पुरस्कृत करण्यात आलेल्या तीन दिवसीय भव्य क्रिकेट स्पर्धेत ए. ए. सँडी स्पोर्ट्स आरवली संघाने विजेतेपद पटकाविले. तर राजू टायगर आरोंदा संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेत एकूण 16 नामांकित संघांनी सहभाग घेतला.आज रविवारी मान्यवरांच्या हस्ते मित्रप्रेम कला क्रीडा मंडळ पुरस्कृत विजेत्या संघास 20,026 रुपये पारितोषिक व कायमस्वरूपी चषक, तर उपविजेत्या संघास 15,026 रुपये पारितोषिक व कायमस्वरूपी चषक प्रदान करण्यात आला. मालिकावीर – कुशल पेडणेकर ( आरोंदा), अंतिम सामनावीर – विनय जाधव ( आरवली), उत्कृष्ट फलंदाज – पवन साळगावकर ( आरोंदा), उत्कृष्ट फलंदाज – गेव्हीन फर्नांडिस (आरवली), उद्योनमुख खेळाडू शुभम पेडणेकर ( आरवली) यांचा व इतर यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर मित्रप्रेम संघांचे ज्येष्ठ खेळाडू सुधाकर सोनसुरकर, नाना कुडाळकर, हरिश्चंद्र सोनसुरकर, प्रल्हाद सोनसुरकर, जीवन कुडाळकर, समिर गडेकर, दादा आईर, दिलीप सोनसुरकर, किशोर सोनसुरकर, सुधीर बोवलेकर, जनार्दन कासले, लक्ष्मण गडेकर, उमेश शेणई, जयसिंग देसाई, विनायक राऊळ,आरवली संघाचा कर्णधार संदिप सावंत व आरोंदा संघाचा कॅप्टन शुभम आरोंदेकर, सत्यवान कुडाळकर, विनोद कुडाळकर, राजू वराडकर, आबा परब, कुलदीप परब, प्रवीण गडेकर, किशोर कासले, मानस रेडकर, यश आईर, पुंडलिक कासले, प्रशांत पार्सेकर, गौरव शेणई, ओंकार धुरी, लवू कासले, श्रीधर नाईक, विश्राम नाईक, गौरव गडेकर, चेतन गडेकर, धनंजय राणे, श्री. तोरसकर, महेश बिबवणेकर, श्रेयस रेडकर, रुपेश परब, सनी गडेकर, विनायक कासले, प्रकाश म्हापणकर, सागर कासले, बाबू खरात, पत्रकार अजय गडेकर, अमेय सुकळवाडकर, हर्षल सोनसुरकर, चिन्मय सोनसुरकर, साईल वराडकर, शुभम वराडकर आदी मंडळाचे पदाधिकारी, खेळाडू उपस्थित होते. स्पर्धेचे उदघाट्न ज्येष्ठ नागरिक सुभाष कासले व जनार्दन कासले यांच्या हस्ते संपन्न झाले. मित्रप्रेम कला क्रीडा मंडळाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले.

You cannot copy content of this page