“शरद मेस्त्री यांच्या पुनर्निवडीबद्दल भाजप वेंगुर्ला तालुका कार्यालयात सत्कार”..

⚡वेंगुर्ला ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्हा विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळाच्या जिल्हा अध्यक्ष पदी शरद मेस्त्री यांची सलग दुसर्‍यांदा निवड झाली.
ही निवड झाल्याबद्दल भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात नूतन नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई , तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, जि.का.का.सदस्य व नगरसेवक सुहास गंवडळकर, जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस, महीला मोर्चाच्या सुजाता पडवळ व वृंदा गवंडळकर, महिला शहर अध्यक्ष श्रेया मयेकर , नगरसेवक सचिन शेटये , किरण कुबल , नगरसेवीका रिया केरकर, गौरी माईणकर, गौरी मराठे, आकांक्षा परब, तसेच हसीनाबेन मकानदार , तसेच विश्वकर्मा समाजाचे संतोष मेस्त्री, आनंद मेस्त्री, महादेव मेस्त्री, अच्युत मेस्त्री आदी पदाधिकारी उपस्थित होते.

वेंगुर्ला : शरद मेस्त्री यांचा सत्कार करताना दिलीप गिरप, प्रसन्ना देसाई, पप्पू परब व अन्य

You cannot copy content of this page