डॉ. दीपक परब: पत्रकार सदस्यांसाठी आयोजित गणेश सजावट स्पर्धा मसुरे येथे संपन्न..
⚡मालवण ता.०४-:
पत्रकार हे संस्कृती जपणारे आणि कला संवेदनशील मनाचे लोक असतात याचा प्रत्यय पत्रकार समितीने आयोजित केलेल्या गणेश सजावटीच्या स्पर्धेतून आला असल्याने मालवण तालुका पत्रकार समितीने पत्रकार बांधवांसाठी घेतलेली गणेश सजावट स्पर्धा कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन मसुरे चांदेर गावचे सुप्रसिद्ध उद्योजक डॉ श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांनी येथे बोलताना केले
मालवण तालुका पत्रकार समितीतर्फे पत्रकार सदस्यांसाठी आयोजित गणेश सजावट स्पर्धा २०२५ मधील विजेत्या पत्रकारांना मसुरे येथे संपन्न झालेल्या मालवण तालुका पत्रकार समिती पुरस्कार वितरण सोहळ्यात पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. प्रथम क्रमांक नितीन गावडे, द्वितीय क्रमांक भूषण मेतर, तृतीय क्रमांक प्रफुल्ल देसाई, तसेच उत्तेजनार्थ प्रथम केशव भोगले, उत्तेजनार्थ द्वितीय मनोज चव्हाण, उत्तेजनार्थ तृतीय अर्जुन बापर्डेकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, तहसीलदार गणेश लव्हे, गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई कमिटी अध्यक्ष उद्योजक डॉ. दीपक परब, माजी जि. प.अध्यक्ष सौ. सरोज परब, मालवण नगरसेविका शर्वरी पाटकर, नीना मुंबरकर, पूनम चव्हाण, डॉ अनिरुद्ध मेहेंदळे, छोटू ठाकूर, मुख्याध्यापिका अर्चना कोदे, प्रफुल्ल देसाई, राजन परब, साहित्यिका वैशाली पंडित, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ सचिव बाळ खडपकर, गुरुनाथ तिरपणकर, जिल्हा पत्रकार संघ उपाध्यक्ष विद्याधर केनवडेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अमित खोत, तालुका पत्रकार समिती अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, सचिव कृष्णा ढोलम आदी उपस्थित होते.
यावेळी उद्योजक डॉ. दीपक परब यांनी मालवण पत्रकार समिती व पत्रकारांच्या कार्याचे कौतुक करत मालवण पत्रकार समितीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करून वेगळा संदेश सर्वांना दिला आहे, असे सांगितले. तसेच उपस्थित तहसीलदार व गटविकास अधिकारी यांचे लक्ष वेधताना बंद पडतं असलेल्या मराठी शाळा, विद्यार्थ्यांची कमी संख्या, शून्य शिक्षिकी शाळा प्रश्न याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे तसेच मर्डे ग्रामपंचायतचे नाव मसूरे असे पूर्ववत करावे, अशी मागणी केली शेवटी दत्तप्रसाद पेंडणेकर यांनी आभार मानले.
