ग्रामीण शिक्षणपद्धतीची दखल घेत इन्सुली शाळेचा सन्मान…
इन्सुली नं. ५ पागावाडी जि.प. शाळेत जनजागृती सेवा संस्थेतर्फे शिक्षकांचा गौरव.. ⚡बांदा ता.०९-: “ग्रामीण भागातील शाळांमध्ये आजही शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता विविध उपक्रम राबवितात. मर्यादित साधनसामग्रीतून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या या शिक्षकांच्या कार्याची समाजाने दखल घेणे गरजेचे आहे. ग्रामीण शाळांमधील ही शिक्षणपद्धती आणि शिक्षकांची तळमळ समाजासमोर यावी, यासाठीच जनजागृती सेवा…
