Headlines

Global Maharashtra Breaking News

आयुर्वेद संशोधक सुमेध जोशी यांना भारत–जपान आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक स्पर्धेत प्रथम क्रमांक…

⚡मालवण ता.१५-:भारत व जपानमधील आघाडीच्या शास्त्रज्ञ आणि तरुण संशोधकांचा सहभाग असलेल्या भारत–जपान आंतरराष्ट्रीय CAFE-PLUS 2025 (Presentation Learning for Young Scholars) या प्रतिष्ठित वैज्ञानिक स्पर्धेत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (AIIA), नवी दिल्ली येथील BAMS, MD आणि PhD (शोधार्थी) असलेले सुमेध जोशी यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. सुमेधा हा मालवण येथील रहिवासी आहे. रोख बक्षिस आणि…

Read Full News

शनिवार, रविवारीही ग्रामपंचायती राहणार सुरू…

ओरोस ता १५जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवार १७ आणि रविवार १८ जानेवारी रोजीची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. उमेदवारांना आवश्यक असलेले दस्तऐवज तत्काळ उपलब्ध व्हावेत, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी आदेश काढले आहे. १६ ते २१ जानेवारी या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. यावेळी इच्छुक उमेदवारांना ग्रामपंचायत मधून…

Read Full News

नामनिर्देशन पत्र भरताना जास्तीत जास्त चार व्यक्तींनाच प्रवेश…

वाहन संख्येवर सुद्धा निर्बंध:सहा. निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले निर्देश.. ⚡कुडाळ ता.१५-: जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. दि. १६ जानेवारी ते २१ जानेवारी दरम्यान नामनिर्देशन पत्र भरली जाणार आहेत. त्यासाठी कुडाळचे तहसिदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटील यांनी काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या सूचनांचे सर्वानी पालन करावे असे…

Read Full News

बांदा नट वाचनालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याची ग्रंथ प्रदर्शनाने सुरुवात…

⚡बांदा ता.१५-: १४ ते २८ जानेवारी या कालावधीत साजरा करण्यात येणाऱ्या मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाची सुरुवात बांदा येथील नट वाचनालयात ग्रंथ प्रदर्शनाने करण्यात आली.या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मराठी धार्मिक ग्रंथांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच धार्मिक ग्रंथांचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.यावेळी प्रमुख वक्ते…

Read Full News

‘बांद्याचा बाप्पा’ मंडळाची सामाजिक बांधिलकी; स्मशानभूमी पत्रा शेडसाठी १ लाखांची देणगी…

⚡बांदा ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवसाला पावणारा म्हणून ख्याती असलेला सार्वजनिक गणेशोत्सव विठ्ठल मंदिर गांधी चौक बांदाच्या ‘बांद्याचा बाप्पा’ मंडळाने आज एक आदर्शवत पायंडा घालताना सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने बांद्यात व्यापारी संघाच्या माध्यमातुन बांधण्यात येत असलेल्या वैकुंठ भूमी(स्मशानभूमी) येथील पत्रा शेडसाठी एक लाख रुपयांची देणगी दान स्वरूपात दिली.बांद्याच्या बाप्पा मंडळाची ही सामाजिक…

Read Full News

कट्टा येथे विद्यार्थ्यांच्या सहभागातून गावठी आठवडी बाजार उपक्रम”…

⚡मालवण ता.१५-: ग्रामीण भागात पिकवली जाणारी विविध धान्य तसेच तयार होणारी विविध उत्पादने यांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, प्रत्यक्ष व्यवहार ज्ञान, विक्री कौशल्य विकसित व्हावे व त्यांना स्थानिक बाजारपेठ मिळावी या उद्देशाने वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथेगावठी आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते या गावठी आठवडी बाजाराचे उद्घाटन शालेय समिती अध्यक्ष श्री…

Read Full News

AWS करिअर टूर्स स्पर्धेत डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय कट्टाने पटकाविला द्वितीय क्रमांक…

⚡मालवण ता.१५-:महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या करिअर कट्टा या विभागांतर्गत AWS करिअर टूर्स या स्पर्धेत कट्टा येथील डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या करिअर कट्टा विभागाने द्वितीय क्रमांक पटकाविला महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान…

Read Full News

मालवण शहरातील मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा…

रश्मीन रोगे यांची नगरपालिकेकडे मागणी.. ⚡मालवण ता.१५-:मालवण दांडी भागात तसेच संपूर्ण मालवण शहरात मोकाट गुरांचा संचार मोठ्या प्रमाणात वाढला असून यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत मालवण नगरपालिका प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे याप्रश्नी लक्ष घालून मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी दांडी…

Read Full News

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज…

सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे:जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.१५-: जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांना निर्भय वातावरणात मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी अत्यंत सतर्कतेने आणि जबाबदारीने काम करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा साॅ मिल असोसिएशन अध्यक्षपदी आनंद गवस यांची निवड झाल्याने बांदा येथे सत्कार…

⚡बांदा ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्हा साॅ मिल असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने येथील उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते आनंद गवस यांचा सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ कट्टा कॉर्नर बांदा यांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.आनंद गवस गेली अनेक वर्ष या व्यवसायामध्ये काम करत आहेत. या असोसिएशनच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना…

Read Full News

You cannot copy content of this page