⚡बांदा ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्हा साॅ मिल असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने येथील उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते आनंद गवस यांचा सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ कट्टा कॉर्नर बांदा यांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
आनंद गवस गेली अनेक वर्ष या व्यवसायामध्ये काम करत आहेत. या असोसिएशनच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. त्यांनी यापूर्वी अनेक मंडळांमध्ये पदाधिकारी म्हणून यशस्वी काम केले आहे. त्याचप्रमाणे आनंद गवस नेहमीच सामाजिक क्षेत्रातही काम करण्यात अग्रेसर असतात. गवस यांचे अभिनंदन करत या मंडळाने त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष संजय नाईक, उपाध्यक्ष आप्पा चिंदरकर, राजू वाळके, भाऊ वळंजू, शशी पित्रे, नाना शिरोडकर, सुभाष शिरोडकर, मंगेश बांदेकर, प्रविण शिरसाट, साईप्रसाद काणेकर, समीर सातार्डेकर, संजय शिरोडकर, आबा सावंत, प्रसाद गायतोंडे, अभय नाईक, प्रमोद कळगुंटकर, अप्पू मांजरेकर, प्रविण गाड आणि मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो:-
बांदा येथे आनंद गवस यांचा सत्कार करताना कट्टा कॉर्नर नवरात्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते.
सिंधुदुर्ग जिल्हा साॅ मिल असोसिएशन अध्यक्षपदी आनंद गवस यांची निवड झाल्याने बांदा येथे सत्कार…
