बांदा नट वाचनालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याची ग्रंथ प्रदर्शनाने सुरुवात…

⚡बांदा ता.१५-: १४ ते २८ जानेवारी या कालावधीत साजरा करण्यात येणाऱ्या मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाची सुरुवात बांदा येथील नट वाचनालयात ग्रंथ प्रदर्शनाने करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मराठी धार्मिक ग्रंथांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच धार्मिक ग्रंथांचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले अनंत भाटे व संचालक प्रकाश पाणदरे यांनी मराठी भाषेचे महत्त्व विशद करून तिचे जतन व संवर्धन करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास नट वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, उपाध्यक्ष निलेश मोरजकर, सचिव राकेश केसरकर, रिना मोजकर, मिलिंद महाजन, अभिजित पोरे, जगन्नाथ शेटकर, विजय देसाई, सालू पेररा, शिवराम राऊळ, गोविंद बांदेकर, करीम आगा यांच्यासह वाचनालयाचे कर्मचारी व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त या कालावधीत हस्ताक्षर स्पर्धा, प्रकटवाचन स्पर्धा व निबंध स्पर्धेचे (शालेय मुलांसाठी) अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी यावेळी दिली.
फोटो:-
बांदा नट वाचनालयात धार्मिक ग्रंथ प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी उपस्थित असलेले मान्यवर व वाचक.

You cannot copy content of this page