Headlines

Global Maharashtra Breaking News

धाकोरे व बांदिवडेवाडी गावाचा निर्धार;रस्ता पूर्ण पक्का होईपर्यंत मतदान बहिष्कार…

सावंतवाडी ता.१६-:धाकोरे गावातील सरकारी २३ नंबर रस्ता (होळीचे भाटले – बांदिवडेवाडी मार्ग) अद्यापही पूर्णपणे मोकळा आणि पक्का न झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, रस्ता सुटेपर्यंत निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामस्थांचे स्पष्ट विधान –“सरकारी रस्ता पूर्णपणे मोकळा व पक्का झाल्याशिवाय आम्ही निवडणुकीत मतदान करणार नाही.” हा मार्ग शाळकरी मुले, गर्भवती महिला,…

Read Full News

केंद्र शाळा आचरे नं 1च्या मुलांनी घालवलानिसर्गाच्या सानिध्यात एक दिवस…

⚡मालवण ता.१६-:नाही पुस्तक…. नाही शाळा…. निसर्गाच्या सानिध्यात हवे तेवढे खेळा…. असे म्हणत तोंडवळी येथील समुद्र किनारी केंद्र शाळा आचरे नं 1च्या मुलांनी एक दिवस रमत निसर्गाचा आनंद घेतला.यावेळी आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, व्यावसायिक महेश राणे आदींनी भेट देत मुलांचा उत्साह वाढविला. केंद्र शाळा आचरे नं 1 च्या विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच अवांतर ज्ञान वृद्धि साठी विविध…

Read Full News

जिल्हा परिषद , पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर देवगड तालुका महाविकास आघाडीची आढावा बैठक संपन्न…

महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी व मनसे सर्व जागा लढवणार.. ⚡देवगड ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवगड तालुका महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली. यामध्ये प्रत्येक विभागानुसार कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आली. इच्छुक उमेदवार यांची नावे देखील घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जेष्ठ नेते नंदुशेट घाटे यांची भेट…

Read Full News

देवगड तालुक्यात निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू…

पहिल्याच दिवशी ९ इच्छुकांनी घेतले अर्ज.. ⚡देवगड ता.१६-: देवगड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुषंगाने उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार आज शुक्रवार,१६ जानेवारी २०२६ रोजी उमेदवारी अर्ज घेण्याची प्रक्रिया पार पडली. या पहिल्याच दिवशी गट व गण मिळून एकूण ९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये जि प…

Read Full News

जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा आडवली नं. 1 शाळेचा अनोखा उपक्रम…

गणितीय पतंग महोत्सवातून सोडविल्या गणीतीय क्लिष्ट संकल्पना रंजक पद्धतीने.. ⚡मालवण ता.१६-:सूर्याच्या उत्तरायणाचा प्रारंभ या भौगोलिक घटनेच्या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी पतंग उडविण्याचा आनंद अनुभवत गणितातील चौरस आणि त्याच्याशी संबंधित लांबी, रुंदी यांचे मापन परिमिती, क्षेत्रफळ आणि काटकोन त्रिकोणाचे गुणधर्म आनंददायी पद्धतीने अभ्यासले. या महोत्सवाच्या आयोजना मागे गणित सारख्या विषयातील निरसता कमी करून त्या विषयातील क्लिष्ट…

Read Full News

देशाचे सुजाण नागरीक बनवण्यास एन. एस. एस. चा मोठा हातभार….

कृ.सी. देसाई शिक्षण मंडळ मालवणचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण यांचे प्रतिपादन.. ⚡मालवण ता.१६-:देशाचे सुजाण नागरिक बनण्यात एनएसएसची भूमिका महत्त्वाची आहे. एनएसएसच्या माध्यमातून विद्यार्थी स्वयंशिस्त, श्रमदान, एकमेकांप्रती आदर, सहकार्याची भावना, समाजातील तळागाळातील लोकांच्या समस्या व त्या समस्यांवर उपाय योजना या गोष्टींची जाणीव होते. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक प्रश्नांची जाणीव निर्माण होण्यास मदत होते. आणि हेच विद्यार्थी…

Read Full News

कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाचे रेखाकला परीक्षेत यश…

⚡सावंतवाडी ता.१६-: कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शासकीय रेखाकला परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले.या शासकीय रेखाकला पऱीक्षा सन २०२५ मधील एलिमेंटरी ग्रेड परीक्षेस ३६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यात कु. समृद्धी सचिन घाटकर, कु. सानवी रवींद्र सावंत, कु. तनया सिद्धू गवळी, कु.अनुराग विजय ठाकर,कु. आर्यन विश्वनाथ जाधव, कु.अवनी रामनाथ बावकर, कु.चैतन्या…

Read Full News

तिलारी घाटात टेम्पो ट्रॅव्हलर चा भीषण अपघात…

⚡दोडामार्ग ता.१६-:तामिळनाडू येथून गोव्याकडे पर्यटनासाठी निघालेल्या पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरला तिलारी घाटात अपघात झाला. अवघड वळण आणि तीव्र उतारामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून गाडी संरक्षक कठड्याला धडकली.या अपघातात तिघे पर्यटक गंभीर जखमी झाले असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. वाहनात एकूण १५ पर्यटक प्रवास करत होते. अपघातानंतर एसटी बसमधील चालक-वाहक व प्रवाशांनी तातडीने मदत करत जखमींना दोडामार्ग…

Read Full News

पतंग उडवू चला गड्यांनो…

घारपी शाळेत मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी अनुभवला पतंगोत्सवाचा आनंद.. ⚡बांदा ता.१६-: मोबाईल, टीव्ही आणि डिजिटल खेळांच्या जमान्यात मैदानी खेळ, पारंपरिक सण आणि लोकसंस्कृतीपासून मुले दूर जात असल्याचे चित्र दिसत असताना, घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने मकर संक्रांतीनिमित्त एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविला. “पतंग उडवू चला गड्यांनो” या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी आकाशात रंगीबेरंगी पतंग उडवत…

Read Full News

महायुतीच्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक महायुतीतच लढवण्याचा निर्णय…

माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची माहिती.. कणकवली : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे अभिनंदन करण्यात येत असून, याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाहीर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका महायुतीतूनच लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी – सिंधुदुर्ग चे…

Read Full News

You cannot copy content of this page