महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी व मनसे सर्व जागा लढवणार..
⚡देवगड ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवगड तालुका महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली. यामध्ये प्रत्येक विभागानुसार कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आली. इच्छुक उमेदवार यांची नावे देखील घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जेष्ठ नेते नंदुशेट घाटे यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकसंघ पणे शांततेच्या मार्गाने निवडणूक यंत्रणा राबवावी व यश संपादन करावे असे यावेळी कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवायच्या असा एकमताने निर्धार यावेळी करण्यात आला. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी कार्यकर्त्यांचा आढावा घेऊन इच्छुक उमेदवारांची नावे घेण्यात आली.
यावेळी उपजिल्हाप्रमुख संदीप कदम, तालुकाप्रमुख रविंद्र जोगल, जयेश नर युवासेना तालुकाप्रमुख गणेश गांवकर, युवक काँग्रेसचे किरण टेंबूलकर, मनसेचे उपजिल्हाप्रमुख चंदन मेस्त्री, उपतालुकाप्रमुख दादा सावंत, महिला उपजिल्हाप्रमुख प्रतिक्षा साटम महिला तालुकाप्रमुख सौ.हर्षा ठाकूर, सौ. वर्षा पवार, विभागप्रमुख रेश्मा सावंत, श्रीकांत गांवकर, मंगेश फाटक, विष्णु घाडी, रमाकांत राणे, बाजीराव जाधव, प्रसाद दुखंडे, शिवदास नरे, शहरप्रमुख तथा नगरसेवक विशाल मांजरेकर, शहरप्रमुख रिया शेडगे, गणेश कांबळी, सुनिल तिर्लोटकर,
निनाद देशपांडे, सुधीर तांबे, गणेश जेठे, प्रशांत साटम, दिनेश लाड, जयवंत गिरकर, भास्कर गावरवडकर, कृष्णा विरकर, सिताराम प्रभु, शांताराम घाडी, सुरेश जाधव, अभिषेक कदम, संतोष मणचेकर, जगन्नाथ गुरव, वसंत पाटील, उमेश पवार, शशांक तावडे, राजन दहिबावकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
