पहिल्याच दिवशी ९ इच्छुकांनी घेतले अर्ज..
⚡देवगड ता.१६-: देवगड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुषंगाने उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार आज शुक्रवार,१६ जानेवारी २०२६ रोजी उमेदवारी अर्ज घेण्याची प्रक्रिया पार पडली. या पहिल्याच दिवशी गट व गण मिळून एकूण ९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
यामध्ये जि प गटासाठी एकूण ६ उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. त्यात उबाठा – ४, अर्ज,इतर पक्ष- १ अर्ज,अपक्ष – १ अर्ज
असे अर्ज दाखल झाले आहेत.
तर प.सं गणासाठी एकूण ३ उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले असून त्यामध्ये उबाठा – १ अर्ज,भाजप – १ अर्ज,अपक्ष – १ अर्ज असे अर्ज दाखल झाले आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होताच देवगड तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, येत्या काही दिवसांत आणखी उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात निवडणूक वातावरण अधिकच तापत चालले आहे.
