देशाचे सुजाण नागरीक बनवण्यास एन. एस. एस. चा मोठा हातभार….

कृ.सी. देसाई शिक्षण मंडळ मालवणचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण यांचे प्रतिपादन..

⚡मालवण ता.१६-:
देशाचे सुजाण नागरिक बनण्यात एनएसएसची भूमिका महत्त्वाची आहे. एनएसएसच्या माध्यमातून विद्यार्थी स्वयंशिस्त, श्रमदान, एकमेकांप्रती आदर, सहकार्याची भावना, समाजातील तळागाळातील लोकांच्या समस्या व त्या समस्यांवर उपाय योजना या गोष्टींची जाणीव होते. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक प्रश्नांची जाणीव निर्माण होण्यास मदत होते. आणि हेच विद्यार्थी देशाचे सुजाण नागरिक म्हणून घडण्यास एनएसएस मोठा हातभार लावते. असे प्रतिपादन कृ.सी. देसाई शिक्षण मंडळ मालवणचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण यांनी येथे बोलताना केले .

साळेल येथे मालवणच्या स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिर संपन्न झाले. त्यावेळी श्री चव्हाण हे बोलत होते

यावेळी व्यासपीठावर साळेल गावचे सरपंच रवींद्र गावडे, उपसरपंच लक्ष्मण परब , प्र. प्राचार्य कैलास राबते, संचालक संदेश कोयंडे, एन.एस. एस. समन्वयक डॉ. देविदास हारगिले, ग्रामसेविका स्वरा परब, पोलिस पाटील रवींद्र गावडे, ग्रामपंचायत सदस्य शिल्पा गावडे, संपदा गावडे उपस्थित होते
प्रारंभी एन. एस. एस. समन्वयक डॉ. देविदास हारगिले यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी श्री चव्हाण यांनी आपल्या विद्यार्थी दशेतील एनएसएसचे अनुभव कथन केले. यावेळी सरपंच श्री गावडे यांनी विद्यार्थ्यांना या शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे यांनी याठिकाणी सर्वच गोष्टी आपणास मनासारख्या मिळणार नाहीत, मात्र त्यावरही मार्ग काढून आपण कसे पुढे जायचे हेच एन. एस. एस. शिकवते. विद्यार्थ्यांनी याचा पुरेपूर फायदा घ्यावा, असे आवाहन केले. तर प्रभारी प्राचार्य प्रा. कैलास राबते यांनी एन. एस. एस. च्या माध्यमातून स्वतःचा सर्वांगीण विकास साध्य करून घ्या, असे आवाहन करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी प्रा डॉ. उज्ज्वला सामंत, डॉ. हंबीरराव चौगले, प्रा. डॉ. एम. आर. खोत, प्रा. एस. पी. खोबरे, प्रा. संग्रामसिंह पवार, प्रा. अन्वेषा कदम, प्रा. हसन खान, प्रा. रोहिणी फाटक, प्रा. रामचंद्र तावडे, सूर्यकांत कदम, महाविद्यालयाचा विद्यार्थी सचिव सर्वेश राणे, उद्योजक अरविंद तावडे, वसंत पडवळ , ग्रामस्थ भानजी गावडे, विवेकानंद पेडणेकर, गणेश गावडे, संतोष गावडे उपस्थित होते या प्रसंगी आवर्जून उपस्थित होते. नरेश गावडे, राजाराम गावडे, मुरारी गावडे, रोशन गावडे, वैभव गावडे, चिन्मय तावडे आणि ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले. सूत्रसंचालन प्रा. प्रमोद खरात यांनी आणि आभार प्रा. डॉ. संकेत बेळेकर यांनी मानले.

You cannot copy content of this page