कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाचे रेखाकला परीक्षेत यश…

⚡सावंतवाडी ता.१६-: कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शासकीय रेखाकला परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले.
या शासकीय रेखाकला पऱीक्षा सन २०२५ मधील एलिमेंटरी ग्रेड परीक्षेस ३६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यात कु. समृद्धी सचिन घाटकर, कु. सानवी रवींद्र सावंत, कु. तनया सिद्धू गवळी, कु.अनुराग विजय ठाकर,कु. आर्यन विश्वनाथ जाधव, कु.अवनी रामनाथ बावकर, कु.चैतन्या कृष्णा पास्ते, कु‌.दुर्वांक किशोर वालावलकर, कु.जिज्ञासा मधुकर देसाई. कु.कनिष्का आत्माराम जळवी असे १० विद्यार्थी “अ” श्रेणीमध्ये तर “ब”श्रेणीमध्ये १४ आणि “क” श्रेणीमध्ये १२ विद्यार्थी उतीर्ण होत १००% निकाल लागला. तसेच इंटरमिजिएट परीक्षेस ३२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यापैकी”अ”श्रेणीमध्ये कु. आदिती नारायण सावंत, कु.दूर्वा संतोष दाभोलकर, कु.गौरी धैर्यशील शिर्के, कु. हिराली सुबोध वराडकर, कु.श्रीयोग नितीन कारेकर, कु.वेणू अजित सावत असे ६ विद्यार्थी तर “ब” श्रेणीमध्ये ६ आणि”क”श्रेणीमध्ये १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी शिंपी मॅडम यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच भेटवस्तू देऊ शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रशालेचे संस्था अध्यक्ष शैलेश पई, प्रशालेचे मुख्याध्यापक एस. व्ही. भुरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अनिल ठाकूर यांनी केले. या विद्यार्थ्यांना प्रशालेचे पर्यवेक्षक सुबोध वराडकर, कलाशिक्षक केदार टेमकर सर यांचे मार्गदर्शन लाभले. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष शैलेश पई, सचिव प्रसाद नार्वेकर, संचालक मंडळ, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एस. व्ही.भुरे, शिक्षक वृंद तसेच संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page