⚡दोडामार्ग ता.१६-:
तामिळनाडू येथून गोव्याकडे पर्यटनासाठी निघालेल्या पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरला तिलारी घाटात अपघात झाला. अवघड वळण आणि तीव्र उतारामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून गाडी संरक्षक कठड्याला धडकली.
या अपघातात तिघे पर्यटक गंभीर जखमी झाले असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. वाहनात एकूण १५ पर्यटक प्रवास करत होते. अपघातानंतर एसटी बसमधील चालक-वाहक व प्रवाशांनी तातडीने मदत करत जखमींना दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टरांच्या माहितीनुसार सर्व जखमींची प्रकृती सध्या स्थिर आहे.
तिलारी घाटात टेम्पो ट्रॅव्हलर चा भीषण अपघात…
