आडवली नं. 1शाळेतील विद्यार्थ्यांनी बनविले आयुर्वेदिक ‘निर्मल उटणे
⚡मालवण ता.१७-:विद्यार्थ्यांच्या अंगी उद्योजक कौशल्यांचा विकास होऊन त्यांच्या मनात व्यवसायिक अभिरुची विकसित व्हावी या हेतूने आडवली नं 1 शाळा विविध उपक्रम राबाविते. याच उपक्रमाचा भाग म्हणून इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी आयुर्वेदिक उटणे निर्माण केले असून त्याच्या विक्रीचा शुभारंभ श्री. अरुण लाड यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. हे उटणे पूर्णतः नैसर्गिक घटकांपासून बनविले असून चंदन, मुलातांनी माती, आंबेहळद,…
