कुडाळ मधून जि प साठी 48 तर पं स साठी 64 अर्ज दाखल…

पिंगुळी जि प साठी तब्बल 11 अर्ज दाखल..

कुडाळ : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जि प साठी 48 तर प स साठी 64 जणांनी अर्ज दाखल केले. पिंगुळी जि प साठी तर तब्बल 11 जणांनी अर्ज दाखल केले. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळूसे यांनी दिली.
जिल्हा परिषद साठी आंबड-3, वेताळ बांबर्डे-7, ओरोस बु्दुक -3, पावशी-9, नेरुळ देऊळवाडा -4, तेंडोली-4, पिगुळी-11,
घावनळे-3, माणगांव -4 असे एकुण 9 मतदारसंघात 48 जणांनी जि. प. साठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
आंबड-4, जांभवडे-4, आवळेगाव-4, वेताळबाबर्डे-5, ओरोस-5, कसाल-4, डिगस-3, पावशी-3, नेरूर उत्तर-3, नेरुर दक्षिण-3, पाट-2, तेडोली-3, पिगुळी-4, साळगाव-4, घावनळे-3, गोठोस-2, माणगांव-5, झाराप-3, असे एकुण – 64 उमेदवारी अर्ज प. स. साठी दाखल झाले आहेत.

You cannot copy content of this page