पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा विश्वास: निवासस्थानी आयोजित बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद..
⚡सावंतवाडी ता.२१-: भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस मा. महेशजी सारंग यांनी काल कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर त्यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीसाठी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
ही गर्दी केवळ संख्येची नव्हे, तर ती
जनतेचा महेशजी सारंग यांच्यावर असलेला विश्वास,कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह आणि आगामी निवडणुकीतील मोठ्या विजयाचा पक्का निर्धार दर्शविणारी होती.
या बैठकीदरम्यान उपस्थितांनी एकमुखाने पाठिंबा दर्शवत “कोलगाव मतदारसंघात आता एकच नारा – महेशजी सारंग विजयी होणारच!” असा जयघोष केला. महेशजी सारंग यांच्या नेतृत्वाखाली कोलगाव मतदारसंघात भाजप अधिक भक्कम होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
